डेटा धोरण

हे धोरण Facebook, Instagram, Messenger आणि Facebook (Facebook उत्पादने किंवा उत्पादने) द्वारा ऑफर केल्या जाणाऱ्या इतर उत्पादनांना आणि वैशिष्‍ट्यांना समर्थन देण्यासाठी आम्ही ज्या माहितीवर प्रक्रिया करतो त्या माहितीचे वर्णन करते. तुम्ही Facebook सेटिंग्ज आणि Instagram सेटिंग्ज मध्ये अतिरिक्त साधने आणि माहिती मिळवू शकता.

आम्ही कोणत्या प्रकारची माहिती संकलित करतो?

Facebook उत्पादने पुरवण्यासाठी, आम्हाला तुमच्या बद्दल असलेल्या माहितीवर प्रक्रिया करणे आवश्यक आहे. तुम्ही आमची उत्पादने कशा प्रकारे वापरता त्यावर आम्ही कोणत्या प्रकारांची माहिती संकलित करतो ते अवलंबून असते. तुम्ही Facebook सेटिंग्ज आणि Instagram सेटिंग्ज ला भेट देऊन आम्ही संकलित करतो त्या माहितीत प्रवेश कसा करायचा आणि ती कशी हटवावी ते जाणून घेऊ शकता..
अशा गोष्टी ज्या तुम्ही आणि इतर लोक करतात आणि प्रदान करतात.
 • तुम्ही प्रदान करता ती माहिती आणि सामग्री. तुम्ही जेव्हा आमची उत्पादने वापरता तेव्हा तुम्ही प्रदान केलेली सामग्री, संप्रषणे आणि इतर माहिती आम्ही संकलित करतो, यामध्ये तुम्ही एखाद्या खात्यासाठी साइनअप करणे, सामग्री तयार करणे किंवा सामायिक करणे आणि इतरांना संदेश पाठवणे किंवा त्यांच्याशी संप्रेषण करणे याचा समावेश होतो. यामध्ये तुम्ही प्रदान करता त्या सामग्री मधील किंवा त्या सामग्री बद्दलच्या माहितीचा (जसे की मेटाडेटा) समावेश होऊ शकतो, जसे की छायाचित्राचे स्थान किंवा फाइल तयार केली गेली ती तारीख. त्यामध्‍ये आम्ही प्रदान करतो त्या आमच्या कॅमेर्‍यासारख्या वैशिष्ट्यांमधून तुम्ही जे पाहता त्याचा देखील समावेश होतो, म्हणून कदाचित तुम्हाला आवडतील असे मुखवटे आणि फिल्टर सुचविणे किंवा पोट्रेट मोड वापरण्‍याबद्दल तुम्हाला टिपा देणे यासारख्‍या गोष्टी आम्ही करू शकतो. आमच्या प्रणाली खाली वर्णन केलेल्या हेतूंसाठी संदर्भाचे आणि त्यामध्‍ये काय आहे त्याचे विश्लेषण करण्यासाठी तुम्ही आणि इतर प्रदान करता त्या सामग्री आणि संप्रेषणांवर स्वयंचलितपणे प्रक्रिया करते. तुम्ही सामायिक करता त्या गोष्टी कोण पाहू शकते त्यावर तुम्ही कसे नियंत्रण करता त्याबद्दल अधिक जाणून घ्‍या.
  • विशिष्‍ट संरक्षणांसह डेटा: तुम्ही तुमच्या Facebook परिचय फील्ड किंवा जीवनातील घटनांमध्‍ये तुमचा धार्मिक दृष्‍टीकोन, राजकीय दृष्‍टीकोन, तुम्हाला "कोणामध्‍ये स्वारस्य आहे," किंवा तुमच्या स्वास्थ्याबद्दल माहिती प्रदान करण्‍याचे निवडू शकता. ही आणि अन्य माहिती (जसे की वांशिक किंवा जातीविषयक मूळ, तत्त्वज्ञानाबद्दलच्या धारणा किंवा व्यापारी संघटनांची सदस्यता) तुमच्या देशाच्या कायद्यांच्या अंतर्गत विशिष्ट संरक्षणांच्या अधीन असू शकेल.
 • नेटवर्क आणि कनेक्शन. तुम्ही ज्या लोकांशी, पृष्‍ठांशी, खात्यांशी, हॅशटॅग्ज आणि समूहांशी कनेक्ट केले आहे त्यांच्याबद्दल आणि आमच्या उत्पादनांवरून तुम्ही त्यांच्याशी कसा परस्परसंवाद साधता जसे की तुम्ही कोणत्या लोकांशी सर्वाधिक संप्रेषण करता किंवा तुम्ही कोणत्या समूहांचा भाग आहात त्याबद्दल आम्ही माहिती संकलित करतो. तुम्ही अपलोड करणे, उपकरणावरून संकालित करणे किंवा आयात करणे निवडल्यास (जसे की अॅड्रेस बुक किंवा कॉल लॉग किंवा SMS लॉग इतिहास) आम्ही संपर्क माहिती देखील संकलित करतो, जिचा वापर आम्ही तुम्हाला आणि इतरांना तुम्ही कदाचित ओळखत असलेल्या लोकांना शोधण्‍यात मदत करण्‍यासाठी आणि खाली सूचीबद्ध केलेल्या अन्य हेतूंसाठी करतो.
 • तुमचा वापर. तुम्ही आमची उत्पादने कशी वापरता जसे की तुम्ही पाहता किंवा प्रतिबद्ध होता ती सामग्री; तुम्ही वापरता ती वैशिष्‍ट्ये; तुम्ही करता ती कृती; तुम्ही ज्यांच्यासह परस्परसंवाद साधता ते लोक किंवा खाती; आणि तुमच्या क्रियाकलापांचा वेळ, वारंवारता आणि कालावधी याबद्दल आम्ही माहिती संकलित करतो. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही आमची उत्पादने वापरता आणि त्यांचा अखेरचा वापर कधी केला आणि आमच्या उत्पादनांवर तुम्ही कोणत्या पोस्ट, व्हिडिओ आणि अन्य सामग्री पाहता त्याचा लॉग आम्ही घेतो. आमच्या कॅमेर्‍यासारख्‍या वैशिष्‍ट्यांचा वापर तुम्ही कसा करता त्याबद्दल देखील आम्ही माहिती संकलित करतो.
 • आमच्या उत्पादनांवर केलेल्या व्यवहारांबद्दल माहिती. तुम्ही आमची उत्पादने खरेदी किंवा अन्य वित्तीय व्यवहारांसाठी वापरल्यास (जसे की तुम्ही खेळामधील खरेदी करता किंवा देणगी देता) तेव्हा, आम्ही त्या खरेदी किंवा व्यवहाराबद्दलची माहिती संकलित करतो. यामध्ये तुमच्या देय माहितीचा, जसे की तुमचा क्रेडिट किंवा डेबिट कार्ड नंबर आणि इतर कार्ड माहिती; आणि इतर खाते आणि प्रमाणीकरण माहिती; आणि बिलिंग, शिपिंग आणि संपर्क तपशील यांचा समावेश होतो.
 • अन्य लोक करत असलेल्या गोष्टी आणि ते तुमच्याबद्दल प्रदान करत असलेली माहिती. इतर लोक आमची उत्पादने वापरतात तेव्हा ते प्रदान करतात ती सामग्री, संप्रेषण आणि माहिती देखील आम्ही प्राप्त करतो आणि तिचे विश्लेषण करतो. यामध्‍ये तुमच्या बद्दलची माहिती समाविष्ट होऊ शकते, जसे की तुमची छायाचित्रे इतर लोक सामायिक करतात किंवा त्यावर टिप्पणी देतात, तुम्हाला संदेश पाठवितात किंवा तुमची संपर्क माहिती अपलोड, संकालित किंवा आयात करतात.
उपकरण माहिती
खाली वर्णन केल्याप्रमाणे, आमच्या उत्पादनांशी एकीकृत होणारे तुम्ही वापरता ते संगणक, फोन, कनेक्ट केलेले टीव्ही आणि वेबशी जोडलेल्या इतर उपकरणांवरून आणि त्यांच्याविषयी आम्ही माहिती संकलित करतो आणि ही माहिती तुम्ही वापरत असलेल्या वेगवेगळ्या उपकरणांवर एकत्रित करतो. उदाहरणार्थ, तुमच्या फोनवर आमच्या उत्पादनांच्या केलेल्या उपयोगाविषयी संकलित केलेल्या माहितीचा वापर आम्ही सामग्री (जाहिरातींच्यासमावेशासह) किंवा वैशिष्ट्ये अधिक उत्तम प्रकारे वैयक्तिकृत करण्यासाठी करतो जी तुम्ही आमची उत्पादने इतर उपकरणांवर वापरत असताना पाहता, जसे तुमचा लॅपटॉप किंवा टॅबलेट, किंवा आम्ही तुमच्या फोनवर दाखविलेल्या जाहिरातींना प्रतिसाद म्हणून तुम्ही काही कृती वेगळ्या उपकरणावर केली आहे किंवा नाही हे मापन करण्यासाठी करतो.

या उपकरणांपासून जी माहिती आम्ही संकलित करतो त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहेः

 • उपकरण वैशिष्ट्ये: माहिती जसे संचालन प्रणाली, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आवृत्त्या, बॅटरीची पातळी, सिग्नलची शक्ती, उपलब्ध संचयन जागा, ब्राउजर प्रकार, अॅप आणि फाईलींची नावे आणि प्रकार आणि प्लगिन्स.
 • उपकरण संचालन: उपकरणावर केलेल्या संचालन आणि वर्तणुकीविषयी माहिती, जसे की विंडो अग्रभूमीला आहे की पार्श्वभूमीला, किंवा माऊसच्या हालचाली (ज्या मनुष्य आणि बॉट्समध्ये फरक दर्शवण्यात मदत करतात).
 • अभिज्ञापक: अनन्य अभिज्ञापक, उपकरणाचे ID, आणि अन्य अभिज्ञापक जसे गेम्स, अॅप्स किंवा तुम्ही वापरता त्या खात्यांमधील आणि कौटुंबिक उपकरणाचे ID (किंवा त्याच उपकरणाशी किंवा खात्याशी संबद्ध असलेले Facebook कंपनी उत्पादनांसाठी अनन्य असलेले इतर अभिज्ञापक).
 • उपकरण सिग्नल: ब्लुटूथ सिग्नल आणि जवळपासच्या वाय-फाय प्रवेश ठिकाणे, बीकन्स आणि सेल टॉवर.
 • उपकरण सेटिंग्ज मधील डेटा: तुम्ही जी उपकरण सेटिंग्ज चालू करता त्याद्वारे आम्ही प्राप्त करू शकतो अशी माहिती, जसे की तुमचे जीपीएस स्थान, कॅमेरा किंवा छायाचित्रांमधील प्रवेश.
 • नेटवर्क आणि कनेक्शन्स: माहिती जसे की तुमच्या मोबाइल ऑपरेटरचे नाव किंवा ISP, भाषा, वेळ क्षेत्र, मोबाइल फोन क्रमांक, IP पत्ता, कनेक्शनचा वेग आणि, काही बाबतीत, इतर उपकरणांविषयी माहिती जी जवळपास किंवा तुमच्या नेटवर्कवर आहेत, ज्यामुळे आम्ही काही गोष्टी करू शकू जसे तुमच्या फोनवरून तुमच्या टिव्हीवर व्हिडिओ प्रवाहित करण्यासाठी मदत करणे.
 • कुकी डेटा: कुकीज ID आणि सेटिंग्जच्या समावेशासहतुमच्या उपकरणावर संचयित केलेल्या कुकीज मधील डेटा, . आम्ही कुकीज कशाप्रकारे वापरतो त्याविषयी Facebook कुकीज धोरण आणि Instagram कुकीज धोरण मध्ये अधिक जाणून घ्या.
भागीदारांकडील माहिती.
जाहिरातदार, अॅप विकासक आणि प्रकाशक आम्हाला ते वापरत असलेल्या Facebook व्यवसाय साधनांद्वारे माहिती पाठवू शकतात, यामध्ये आमच्या सोशल प्लग-इन (जसे आवडले बटण), Facebook लॉगिन, आमचेAPI आणि SDK किंवा Facebook पिक्सेल यांचा समावेश होतो. हे भागीदार तुमच्या Facebook च्या बाहेरील क्रियाकलापांबद्दल माहिती पुरवतात – यामध्ये तुमच्या उपकरणाची, तुम्ही भेट दिलेल्या वेबसाइटची, तुम्ही केलेल्या खरेदींची, तुम्ही पाहत असलेल्या जाहिरातींची, आणि तुम्ही त्यांची सेवा कशा प्रकारे वापरता त्या माहितीचा समावेश होतो -जरी तुमचे Facebook खाते असले किंवा नसले किंवा तुम्ही Facebookवर लॉगिन केलेले असले अथवा नसले तरीही. उदाहरणार्थ, एक गेम विकासक आमचे API वापरून आम्हाला सांगू शकतो की तुम्ही कोणते गेम खेळता, किंवा एखादा व्यवसाय तुम्ही त्यांच्या स्टोअरमध्ये केलेल्या खरेदीबद्दल आम्हाला सांगू शकतो. तुमची माहिती आम्हाला प्रदान करण्याचे अधिकार असलेल्या तृतीय पक्ष डेटा प्रदात्यांकडील तुमच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन कृती आणि खरेदींबाबतही आम्ही माहिती मिळवितो.

जेव्हा तुम्ही भागीदारांना भेट देता किंवा त्यांच्या सेवा वापरता तेव्हा किंवा ते ज्या त्रयस्थ पक्षांसह काम करतात त्यांच्याद्वारे त्यांना तुमचा डेटा मिळतो. या प्रत्येक भागीदारांनी कोणताही डेटा आम्हाला प्रदान करण्यापूर्वी तुमचा डेटा संकलित करणे, वापरणे आणि सामायिक करण्याचे त्यांच्याकडे कायदेशीर अधिकार असणे आमच्यासाठी आवश्यक आहे. आम्ही कोणत्या प्रकारच्या भागीदारांकडून डेटा प्राप्त करतो त्याबद्दलअधिक जाणून घ्या.

आम्ही Facebook व्यवसाय साधनांशी संबंधित कुकीज कशाप्रकारे वापरतो त्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी Facebook कुकीज धोरण आणि Instagram कुकीज धोरणाचेपुनरावलोकन करा.

आम्ही ही माहिती कशी वापरतो?

आमच्याकडे असलेली माहिती (तुम्ही केलेल्या निवडींच्या अधीन) आम्ही खाली वर्णन केल्याप्रमाणे आणि Facebook अटी आणि Instagram अटींमध्ये वर्णन केलेल्या Facebook उत्पादने आणि संबंधित सेवा पुरवण्यासाठी आणि त्यांना समर्थन देण्यासाठी वापरतो. कसे ते येथे दिले आहे:
आमची उत्पादने पुरविणे, वैयक्तिकृत करणे आणि सुधारणे.
आमच्याकडे असलेली माहिती आम्ही आमची उत्पादने वितरित करण्यासाठी आणि वैशिष्ट्ये व सामग्री (तुमच्या ताज्या बातम्या, Instagram फीड, Instagram कथा आणि जाहिरातींसह) वैयक्तिकृत करण्‍यासह आमच्या उत्पादनांमधील किंवा त्याव्यतरिक्त तुम्हाला सूचना (जसे की तुम्हाला स्वारस्य असलेले समूह किंवा कार्यक्रम किंवा तुम्ही अनुसरण करू इच्छिता असे विषय) देण्‍यासाठी वापरतो. अनन्यसाधारण आणि तुमच्याशी संबंधित आहेत अशी वैयक्तिकृत उत्पादने निर्माण करण्यासाठी आम्ही तुमच्याकडून आणि इतरांकडून संकलित केलेल्या डेटावर (यामध्ये तुम्ही प्रदान करण्‍याचे निवडलेल्या कोणत्याही खास संरक्षण असलेल्या डेटाचा समावेश होतो); तुम्ही आमची उत्पादने कशी वापरता आणि त्यांच्याशी परस्परसंवाद कसा साधता यावर; आणि तुम्ही ज्यांच्याशी जोडलेले आहात किंवा ज्यांच्याविषयी उत्सुक आहात ते लोक, ठिकाणे, किंवा गोष्टी यांवर आधारित तुमचे संपर्क, पसंत्या, स्वारस्ये आणि क्रियाकलाप वापरतो. तुमचा Facebook आणि Instagram चा अनुभव Facebook उत्पादनांमधील वैशिष्ट्‍ये, सामग्री आणि शिफारसींसह वैयक्तिकृत करण्यासाठी तुमच्याबद्दलची माहिती आम्ही कशी वापरतो त्याबद्दल अधिक जाणून घ्या; तुम्ही पाहत असलेल्या जाहिरातीआम्ही कशी निवडतो याबद्दलही तुम्ही अधिक जाणून घेऊ शकता.
 • Facebook उत्पादने आणि उपकरणांवरील माहिती: तुम्ही जेव्हाही Facebook उत्पादने वापरता तेव्हा तुम्हाला सर्व उत्पादनांवर अधिक अनुरूप आणि सातत्यपूर्ण अनुभव प्राप्त व्हावा यासाठी आम्ही Facebookची वेगवेगळी उत्पादने आणि उपकरणांवरील तुमच्या क्रियाकलापाची माहिती जोडतो. उदाहरणार्थ, आम्ही तुम्हाला सुचवू शकतो की तुम्ही Facebook वर अशा एखाद्या गटामध्ये सामिल व्हावे ज्यामध्ये तुम्ही Instagram वर ज्यांचे अनुसरण करता किंवा Messenger वापरून ज्यांच्याशी संवाद साधता ते लोक सामील आहेत. आम्ही तुमचा अनुभव अधिक अखंड सुद्धा बनवू शकतो, उदाहरणार्थ, जेव्हा एका Facebook उत्पादनावरून तुम्ही एका वेगळ्या उत्पादनावर खाते उघडण्यासाठी साइन अप करता तेव्हा स्वयंचलितपणे तुमची नोंदणी माहिती भरून (जसे की तुमचा फोन नंबर).
 • स्थान-संबंधी माहिती: आम्ही स्थान-संबंधी माहिती-जसे की तुमचे वर्तमान स्थान, तुम्ही कोठे राहता, तुम्हाला जायला आवडते ती ठिकाणे, आणि तुमच्या जवळ असलेले व्यवसाय किंवा लोक- यांचा वापर तुम्हाला आणि इतरांना, जाहिरातींसह आमची उत्पादने पुरवण्यासाठी, वैयक्तिकृत करण्यासाठी आणि सुधारण्यासाठी वापरतो. स्थान-संबंधी माहिती अशा गोष्टींवर आधारित असू शकते जसे की अचूक उपकरण स्थान (जर तुम्ही आम्हाला ते संकलित करण्यास अनुमती दिली तर), IP पत्ते आणि तुमच्या आणि इतरांच्या Facebook उत्पादनांच्या वापरापासून माहिती (जसे की जेव्हा चेक-इन करता किंवा ज्या कार्यक्रमांना उपस्थित राहता).
 • उत्पादन संशोधन आणि विकास: आमच्याकडे असलेली माहिती आम्ही आमची उत्पादने विकसित करणे, चाचणी करणे आणि सुधारणा करण्यासाठी वापरतो, ज्यामध्ये सर्वेक्षणे आणि संशोधन आयोजित करणे, आणि नवीन उत्पादनांची व वैशिष्ट्यांची चाचणी आणि समस्यानिवारणाचा सुद्धा समावेश आहे.
 • चेहऱ्याची ओळख: जर तुम्ही ते सुरू केले तर, तुमचे फोटो, व्हिडिओ आणि कॅमेरा अनुभवांमध्ये तुम्हाला ओळखण्यासाठी आम्ही चेहरा ओळखणारे तंत्रज्ञान वापरतो. चेहरा-ओळखण्याची जी टेम्पलेट आम्ही निर्माण करतो त्यामध्ये तुमच्या देशाच्या कायद्याखाली खास संरक्षण असलेला डेटा असू शकतो. आम्ही चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान कसे वापरतो, किंवा या तंत्रज्ञानाचा Facebook सेटिंग्ज मध्ये आमचा वापर कसा नियंत्रित करतो याविषयी अधिक जाणून घ्या. आम्ही चेहरा-ओळखण्याचे तंत्रज्ञान तुमच्या Instagram अनुभवांमध्ये सादर केल्यास आम्ही प्रथम तुम्हाला ते कळवू, आणि आम्ही हे तंत्रज्ञान तुमच्यासाठी वापरायचे की नाही यावर तुमचे नियंत्रण असेल.
 • जाहिराती आणि इतर प्रायोजित सामग्री: आमच्याकडे तुमच्याविषयी असलेली माहिती-तुमच्या आवडीनिवडी, कृती आणि संलग्नतांच्या माहितीसह-आम्ही जाहिराती, प्रस्ताव आणि इतर प्रायोजित सामग्री निवडण्यासाठी आणि वैयक्तिकृत करण्यासाठी वापरतो जी आम्ही तुम्हाला दाखवतो. आम्ही जाहिराती कशा निवडतो आणि वैयक्तिकृत करतो आणि तुमच्यासाठी जाहिराती आणि इतर प्रायोजित सामग्री निवडण्यासाठी आम्ही वापरतो त्या डेटाच्या तुमच्या निवडींविषयी Facebook सेटिंग्ज आणि Instagram सेटिंग्जमध्ये अधिक जाणून घ्या.
मापन, विश्लेषणे, आणि इतर व्यवसाय सेवा पुरवणे.
आमच्याकडे असलेली माहिती (आमच्या उत्पादनांच्या बाहेरील तुमचे क्रियाकलाप, जसे की तुम्ही भेट देत असलेल्या वेबसाइट आणि पाहत असलेल्या जाहिराती) आम्ही जाहिरातदार आणि इतर भागीदारांना त्यांच्या जाहिराती आणि सेवांचा परिणामकारकपणा आणि वितरणाचे मापन करण्यास मदत करण्यासाठी, आणि त्यांच्या सेवा वापरणार्‍या लोकांचे प्रकार आणि लोक त्यांच्या वेबसाइट, अॅप्स, आणि सेवांसह कसे परस्परसंवाद करतात ते समजून घेण्यासाठी वापरतो. या भागीदारांसह आम्ही माहिती कशाप्रकारे सामायिक करतो ते जाणून घ्या.
सुरक्षितता, एकीकरण आणि संरक्षणाचा प्रचार करणे.
आमच्याकडे असलेली माहिती आम्ही खाते आणि क्रियाकलाप सत्यापित करण्‍यासाठी, हानिकारक आचरणाशी सामना करण्यासाठी, स्पॅम आणि अन्य वाईट अनुभव शोधण्यासाठी आणि प्रतिबंध करण्यासाठी, आमच्या उत्पादनांचे एकीकरण कायम राखण्यासाठी, आणि Facebook उत्पादनांवर आणि त्याबाहेर सुरक्षितता व संरक्षणाचा प्रचार करण्यासाठी वापरतो. उदाहरणार्थ, आम्ही आमच्याकडे असलेला डेटा संशयास्पद क्रियाकलापांचे किंवा आमच्या अटींच्या अथवा धोरणांच्या उल्लंघनांची तपासणी करण्यासाठी किंवा जेव्हा गरज असेल तेव्हा एखाद्यास मदतकरण्यासाठी वापरतो. अधिक जाणून घेण्यासाठी, Facebook संरक्षण मदत केंद्र आणि Instagram संरक्षण टिपाला भेट द्या.
तुमच्याशी संप्रेषण करणे.
तुम्हाला विपणन संप्रेषणे पाठवण्यासाठी, आमच्या उत्पादनांबद्दल तुमच्याशी संप्रेषण करण्यासाठी आणि आमची धोरणे आणि अटींबद्दल तुम्हाला कळविण्यासाठी आम्ही तुमची माहिती वापरतो. तुम्ही जेव्हा आमच्याशी संपर्क करता तेव्हा तुम्हाला प्रतिसाद देण्यासाठी देखील आम्ही तुमची माहिती वापरतो.
सामाजिक कल्याणासाठी संशोधन करणे आणि नाविन्य आणणे.
आमच्याकडे (आम्ही ज्या संशोधन भागीदारांसह सहयोग करतो त्यांच्याकडे असलेल्या माहितीसह) असलेली माहिती आम्ही संशोधन करण्‍यास आणि त्यास समर्थन देण्‍यासाठी आणि सामान्य सामाजिक हित, तंत्रज्ञान विकास, सार्वजनिक हित, आरोग्य आणि लोकांचे कल्याण या विषयांवरील कल्पकतेसाठी वापरतो. उदाहरणार्थ, बचाव कार्यांच्या प्रयत्नांना मदत करण्यासाठी आम्ही आमच्याकडे असलेल्या संकट काळातील स्थलांतर नमुन्यांबद्दलच्या माहितीचे विश्लेषण करतो. आमच्या संशोधन कार्यक्रमांविषयी अधिक जाणून घ्या.

ही माहिती कशी सामायिक केली जाते?

तुमची माहिती इतरांसह खालील प्रकारे सामायिक केली जाते:

Facebook उत्पादनांवर सामायिक करणे
तुम्ही ज्यांच्यासह सामायिक करता आणि संप्रेषण करता ते लोक आणि खाती
जेव्हा तुम्ही आमची उत्पादने वापरुन सामायिक करता आणि संप्रेषण करता तेव्हा, तुम्ही जे सामायिक करता ते कोणते प्रेक्षक पाहू शकतील हे तुम्ही निवडता. तुम्ही Facebook वर पोस्ट करता तेव्हा, तुम्ही पोस्टसाठी प्रेक्षक निवडता, जसे की समूह, तुमचे सर्व मित्र किंवा लोक किंवा लोकांची सानुकूलित सूची. तशाच प्रकारे, जेव्हा तुम्ही लोकांसह किंवा व्यवसायांसह संप्रेषण करण्यासाठी Messenger किंवा Instagram वापरता, तेव्हा ते लोक आणि व्यवसाय तुम्ही पाठवलेली सामग्री पाहू शकतात. तुमचे नेटवर्क देखील जाहिराती आणि प्रायोजित सामग्री मधील प्रतिबद्धतेसह तुम्ही आमच्या उत्पादनांवर केलेल्या कृती पाहू शकते. आम्ही इतर खात्यांना त्यांच्या Facebook किंवा Instagram कथा कोणी पाहिल्या आहेत ते देखील पाहू देतो.

एखाद्या व्यक्तीचे खाते नसले तरीदेखील त्या व्यक्तीसह आमच्या उत्पादनांवर किंवा त्याबाहेर सार्वजनिक माहिती कोणीही पाहू शकते. यामध्ये तुमचे Instagram वापरकर्तानाव; तुम्ही सार्वजनिक प्रेक्षकांसह सामायिक करता अशी कोणतीही माहिती; तुमच्या Facebook वरील सार्वजनिक परिचयामधील माहिती, आणि तुम्ही Facebook पृष्ठावर, सार्वजनिक Instagram खात्यावर किंवा Facebook Marketplace सारख्या अन्य सार्वजनिक मंचावर सामायिक करता अशा माहितीचा समावेश होतो. तुम्हाला, Facebook आणि Instagram वापरणाऱ्या इतर लोकांना आणि अन्य Facebook कंपनी उत्पादनांसह शोध परिणामांमध्ये, किंवा साधने आणि API द्वारे आम्ही आमच्या उत्पादनांवरील किंवा त्याबाहेरील कोणालाही प्रवेश देऊ शकतो किंवा सार्वजनिक माहिती पाठवू शकतो. सार्वजनिक माहिती शोध इंजिने, API यासारख्‍या तृतीय पक्ष सेवा आणि टीव्ही सारखा ऑफलाइन मीडिया आणि आमच्या उत्पादनांचे एकीकरण करणारे अॅप्स, वेबसाइट आणि अन्य सेवांद्वारे पाहिली देखील जाऊ शकते, तिच्यात प्रवेश केला जाऊ शकतो, ती पुन्हा सामायिक केली जाऊ शकते.

कोणती माहिती सार्वजनिक आहे आणि Facebook आणि Instagram वर तुमची दृष्यमानता कशाप्रकारे नियंत्रित करावी याविषयी अधिक जाणून घ्या.
इतर सामायिक करतात किंवा पुनर्सामायिक करतात अशी तुमच्याबद्दलची सामग्री
तुम्ही सामायिक करण्यासाठी कोणाची निवड करता याचा तुम्ही विचार केला पाहिजे, कारण जे लोक तुमचे कार्यकलाप आमच्या उत्पादनांवर पाहू शकतात ते त्या इतरांसह आमच्या उत्पादनांवर आणि त्याबाहेर सामायिक करण्याचे निवडू शकतात, यामध्ये तुम्ही सामायिक केलेल्या प्रेक्षकांच्या बाहेरील लोक आणि व्यवसायांचाही समावेश होतो. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही काही पोस्ट सामायिक करता किंवा विशिष्ट मित्र किंवा खात्यांना संदेश पाठवता, तेव्हा ते ती सामग्री डाऊनलोड करू शकतात, तिचा स्क्रीनशॉट घेऊ शकतात, किंवा आमच्या उत्पादनांवर किंवा उत्पादनांच्या बाहेर ती व्यक्तिशः किंवा आभासी वास्तव अनुभवांमध्ये जसे की Facebook स्थाने वर पुनर्सामायिक करू शकता. तसेच, जेव्हा तुम्ही दुसऱ्या कुणाच्यातरी पोस्टवर टिप्पणी देता किंवा त्यांच्या सामग्रीवर प्रतिक्रिया देता, तेव्हा तुमची टिप्पणी किंवा प्रतिक्रिया कोणालाही दिसू शकते जे इतर लोकांची सामग्री पाहू शकतात, आणि ती व्यक्ती नंतर प्रेक्षक बदलू शकते.

लोक आमची उत्पादने तुमच्याविषयी सामग्री निर्माण करणे आणि त्यांच्या निवडीच्या प्रेक्षकांसह सामायिक करण्यासाठी सुद्धा वापरू शकतात. उदाहरणार्थ, लोक एखाद्या कथेत तुमचा फोटो सामायिक करू शकतात, एखाद्या पोस्टमध्ये तुमचा उल्लेख किंवा पोस्टमधील स्थानावर तुम्हाला टॅग करू शकतात, किंवा त्यांच्या पोस्ट किंवा संदेशांमध्ये तुमच्याविषयी माहिती सामायिक करू शकतात. जर तुम्हाला इतरांनी तुमच्याविषयी आमच्या उत्पादनांवर काय सामायिक केले आहे त्याविषयी अस्वस्थता वाटत असेल, तर तुम्ही सामग्रीविषयी अहवालकशाप्रकारे द्यायचा ते जाणून घेऊ शकता.
आमच्या उत्पादनांवर तुमच्या सक्रीय स्थितीविषयी किंवा उपस्थितीविषयी माहिती.
तुमच्या नेटवर्कमधील लोक ते सिग्नल पाहू शकतात जे तुम्ही आमच्या उत्पादनांवर सक्रीय असल्याविषयी, तुम्ही Instagram, Messengerवर किंवा Facebook वर, सध्या सक्रीय आहात का त्याबद्दल किंवा तुम्ही आमची उत्पादने सर्वात शेवटी केव्हा वापरली होती त्याच्या समावेशासह सांगतात.
आमच्या उत्पादनांवरील किंवा त्या वापरणाऱ्या अॅप, वेबसाइट आणि तृतीय-पक्षांची एकीकरणे.
जेव्हा तुम्ही आमच्या सेवा वापरणारे किंवा आमच्या सेवांशी एकीकरण झालेले तृतीय-पक्ष अॅप, वेबसाइट किंवा इतर सेवा वापरण्याची निवड करता तेव्हा, तुम्ही जे पोस्ट करता किंवा सामायिक करता त्याबद्दलची माहिती त्यांना मिळू शकते. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही Facebook वरील मित्रांसोबत खेळ खेळता किंवा एखाद्या वेबसाइटवर Facebook टिप्पणी किंवा सामायिक करा बटण वापरता तेव्हा, खेळ विकासकास किंवा वेबसाइटला खेळामधील तुमच्या क्रियाकलापांबद्दल माहिती मिळू शकते किंवा तुम्ही त्यांच्या वेबसाइटवरून Facebook वर सामायिक करत असलेली टिप्पणी किंवा दुवा प्राप्त होऊ शकतो. तसेच, तुम्ही अशा प्रकारच्या तृतीय-पक्ष सेवा डाऊनलोड करता किंवा वापरता तेव्हा, ते तुमचा Facebook वरील सार्वजनिक परिचय आणि कोणतीही माहिती जी तुम्ही त्यांच्यासह सामायिक करता त्यामध्‍ये प्रवेश करू शकतात. जर तुमच्या Facebook मित्रांची सूची तुम्ही सामायिक करण्याची निवड केली तर ती तुम्ही वापरत असलेल्या अॅप्स आणि वेबसाईट्सना मिळू शकते. परंतु तुम्ही वापरत असलेल्या अॅप्स आणि वेबसाईट्सना तुमच्याकडून तुमच्या Facebook मित्रांबाबत किंवा तुमच्या कोणत्याही Instagram अनुसरणकर्त्यांबाबत कोणतीही माहिती मिळणार नाही (तथापि तुमचे मित्र आणि अनुसरणकर्ते, अर्थातच ही माहिती स्वतः सामायिक करण्याची निवड करू शकतात). या तृतिय-पक्ष सेवांद्वारे संकलित केली गेलेली माहिती ही नसून त्यांच्या स्वतःच्या अटी व धोरणांच्या अधीन आहे.

Facebook आणि Instagram च्या मूळ आवृत्ती प्रदान करणाऱ्या उपकरणे आणि ऑपरेटिंग सिस्टिम्ससह जी माहिती सामायिक करण्याची तुम्ही निवड कराल त्या सर्व माहितीमध्ये त्यांना प्रवेश असेल, (अर्थात जिथे आम्ही आमची प्रथम-पक्ष अॅप्स विकसित केलेली नाहीत तिथे) यामध्ये तुमचे मित्र तुमच्याशी सामायिक करत असलेल्या माहितीचा समावेश होतो, ज्यायोगे ते तुम्हाला आमची मुख्य कार्यक्षमता प्रदान करू शकतील.

टीप: विकासकाचा डेटा प्रेवश निर्बंधित करण्याची आमची प्रक्रिया चालू आहे अगदी छळास प्रतिबंध करण्यास मदत करण्यापर्यंत. उदाहरणार्थ, जर गेल्या 3 महिन्यांमध्ये तुम्ही विकासकाचे अॅप वापरले नसेल तुमच्या Facebook आणि Instagram डेटातील त्यांचा प्रवेश आम्ही काढून टाकू आणि आम्ही लॉगिन बदलत आहोत, म्हणजे पुढील आवृत्तीमध्ये, अॅपच्या पुनरावलोकनाविना अॅप ज्या डेटाची विनंती करू शकते तो आम्ही कमी करू आणि केवळ नाव, Instagram वापरकर्तानाव आणि परिचय, परिचय छायाचित्र आणि ईमेल पत्ता समाविष्ट करू. इतर कोणत्याही डेटाची विनंती करण्यासाठी आमची मंजूरी आवश्यक असेल.
नवीन मालक.
आमच्या संपूर्ण किंवा आंशिक सेवांची मालकी किंवा नियंत्रण किंवा त्यांच्या मालमत्ता बदलल्या तर, आम्ही तुमची माहिती नवीन मालकाकडे हस्तांतरित करू शकतो.

तृतीय पक्ष भागीदारांसह सामायिक करणे
आमच्या सेवा प्रदान करण्यात व सुधारण्यात मदत करणार्‍या तृतीय पक्षासोबत किंवा जे त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी Facebook व्यवसाय साधनांचा वापर करतात अशा लोकांसोबत आम्ही कार्य करतो, त्यामुळे आमच्या कंपन्यांचे संचालन करणे आणि जगभरातील लोकांना विनामूल्य सेवा प्रदान करणे शक्य होते. आम्ही तुमची कोणतीही माहिती कोणालाही विकत नाही आणि कधीही विकणार नाही. आम्ही पुरवतो तो डेटा आमचे भागीदार कशाप्रकारे वापरू शकतात आणि उघड करू शकतात त्यावर सुद्धा आम्ही कठोर निर्बंध लादतो. आम्ही ज्या प्रकारच्या तृतीय पक्षांसोबत माहिती सामायिक करतो ते असे आहेत:
आमच्या विश्लेषण सेवा वापरणारे भागीदार.
लोक त्यांच्या पोस्ट, सूची, पृष्ठे, व्हिडिओ आणि इतर सामग्रीसह Facebook उत्पादनांवर आणि त्याबाहेर कशा प्रकारे स्वत:स गुंतवून घेत आहेत याबाबत लोकांना आणि व्यवसायांना समजून घेण्यास मदत करणारी संकलित आकडेवारी आणि अंतर्दृष्टी आम्ही पुरवतो. उदाहरणार्थ, पृष्ठ प्रशासक आणि Instagram व्यवसाय परिचयांना त्यांच्या पोस्ट पाहिलेल्या, प्रतिक्रिया दिलेल्या, किंवा त्याच्या पोस्टवर टिप्पणी केलेल्या लोकांच्या किंवा खात्यांच्या संख्येविषयीची, तसेच संकलित जनसांख्यिकीविषयीची आणि इतर माहिती मिळते जी त्यांना त्यांचे पृष्ठ किंवा खात्याशी झालेले परस्परसंवाद समजून घेण्यास मदत करते.
जाहिरातदार.
आम्ही जाहिरातदारांना त्यांच्या जाहिराती पाहणाऱ्या लोकांचे प्रकार आणि त्यांच्या जाहिराती कशा प्रकारे कार्यप्रदर्शन करत आहेत त्याबद्दल अहवाल पुरवतो, परंतु तुम्ही आम्हाला तशी परवानगी दिल्याशिवाय, तुमची वैयक्तिकरित्या ओळख पटवेल अशी माहिती आम्ही सामायिक करत नाही (तुमचे नाव किंवा तुम्हाला संपर्क करण्यासाठी किंवा तुम्ही कोण आहात ते ओळखण्यासाठी वापरता येईल असा इमेल पत्ता यासारखी माहिती). उदाहरणार्थ, आम्ही सर्वसाधारण जनसांख्यिकीय आणि स्वारस्याची माहिती जाहिरातदारांना पुरवतो (उदाहरणार्थ, एखादी जाहिरात 25 ते 34 वयाच्या मधील स्त्रीने पाहिली होती जी माद्रीदमध्ये राहते आणि तिला सॉफ्टवेअर इंजिनियरिंग आवडते) ज्यामुळे त्यांना त्यांच्या प्रेक्षकांविषयी अधिक उत्तम रितीने समजून घेता येईल. कोणत्या Facebook जाहिरातींनी तुम्हाला खरेदी करण्यास किंवा जाहिरातदारासह कृती करण्यास भाग पाडले याची सुद्धा आम्ही पुष्टी करतो.
मापन भागीदार.
ज्या कंपन्या आमच्या भागीदारांना विश्लेषण आणि मापन अहवाल पुरवण्यासाठी माहिती संकलित करतात त्यांच्यासह आम्ही तुमच्याबद्दलची माहिती सामायिक करतो.
आमच्या उत्पादनांमध्ये माल आणि सेवा देऊ करणारे भागीदार.
जेव्हा तुम्ही काही प्रिमियम माहिती प्राप्त करण्यासाठी सदस्यता घेता, किंवा आमच्या उत्पादनांमधील विक्रेत्याकडून काही खरेदी करता, ती सामग्री निर्माण करणारा किंवा विक्रेता तुमची सार्वजनिक माहिती आणि त्यांच्यासह तुम्ही सामायिक केलेली इतर माहिती, तसेच व्यवहार पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती, शिपिंग आणि संपर्काच्या तपशीलासह प्राप्त करू शकतो.
विक्रेते आणि सेवा प्रदाते.
आमच्या व्यवसायाला समर्थन देतात असे विक्रेते आणि सेवा प्रदात्यांना तांत्रिक पायाभूत सेवा पुरवून, आमची उत्पादने कशा प्रकारे वापरली जात आहेत त्याचे विश्लेषण करून, ग्राहक सेवा पुरवून, देयके भरण्याची सुविधा उपलब्ध करून किंवा सर्वेक्षणे आयोजित करून आम्ही माहिती आणि सामग्री पुरवतो.
संशोधक आणि शिक्षक.
आमचा व्यवसाय किंवा मोहिमांना समर्थन देणाऱ्या आणि सर्वसाधारण सामाजिक कल्याण, तांत्रिक प्रगती, जनतेचे हित, आरोग्य आणि कल्याणाच्या विषयांवर संशोधन करण्यासाठी तसेच नाविन्यतेत वृद्धी करण्यासाठी शिष्यवृत्ती आणि नाविन्यता विकसित करणाऱ्या संशोधक भागीदार आणि अध्यापकांनासंशोधन आयोजित करण्यासाठी आम्ही माहिती आणि सामग्री सुद्धा प्रदान करतो.
कायदा अंमलबजावणी किंवा कायदेशीर विनंत्या.
आम्ही खाली विशद केलेल्या परिस्थितींमध्ये कायदा अंमलबजावणी करणार्‍यांसह किंवा कायदेशीर विनंत्यांना प्रतिसाद म्हणून माहिती सामायिक करतो.
तृतीय-पक्ष भागीदारांसह तुम्ही किंवा इतर सामायिक करत असलेली तुमच्याविषयीची माहिती तुम्ही कशी नियंत्रित करू शकता याविषयी Facebook सेटिंग्ज आणि Instagram सेटिंग्ज मध्ये अधिक जाणून घ्या.

Facebook कंपन्या कशा प्रकारे एकत्रितपणे काम करतात?

तुम्ही वापरता त्या सर्व Facebook कंपनी उत्पादनांवर नावीन्यपूर्ण, संबंधित, सुसंगत आणि सुरक्षित अनुभव प्रदान करण्‍यासाठी Facebook आणि Instagram अन्य Facebook कंपन्यांसह (ज्यामध्‍ये WhatsApp आणि Oculus यांचा समावेश होतो) आधारभूत संरचना, सिस्टीम आणि तंत्रज्ञान सामायिक करतात. लागू असलेल्या कायद्याद्वारे अनुमती असेल आणि त्यांच्या अटी व धोरणांच्या अनुपालनानुसार या उद्देशांसाठी आम्ही तुमच्याविषयीच्या माहितीवर सर्व Facebook कंपन्यांमध्ये प्रक्रिया करतो. उदाहरणार्थ, WhatsAppच्या सेवांवर स्पॅम पाठवणाऱ्या खात्यांविषयी माहितीवर आम्ही प्रक्रिया करतो ज्यायोगे आम्ही त्या खात्यांविरूद्ध Facebook, Instagram किंवा Messenger वर योग्य कारवाई करू शकू. लोक Facebook कंपनी उत्पादने कशा प्रकारे वापरत आहेत आणि संवाद साधत आहेत ते समजून घेण्यासाठी सुद्धा आम्ही काम करतो, जसे की वेगवेगळ्या Facebook कंपनी उत्पादनांवर अनन्य वापरकर्त्यांची संख्या समजून घेणे.

मी माझ्याबद्दलची माहिती कशी व्यवस्थापित करू किंवा हटवू?

तुमच्या डेटामध्‍ये प्रवेश करणे, सुधारणे, हलवणे आणि मिटवण्याची क्षमता आम्ही तुम्हाला प्रदान करतो. तुमच्या Facebook सेटिंग्ज आणि Instagram सेटिंग्जमध्ये अधिक जाणून घ्या.

जोपर्यंत आमच्या सेवा आणि Facebook उत्पादने पुरवणे यापुढे आवश्यक नाही, किंवा जोपर्यंत तुमचे खाते हटवले जात नाही – जे अगोदर होईल तोपर्यंत आम्ही डेटा संचयित करतो. डेटाचे स्वरूप, तो का संकलित आणि प्रक्रिया केला गेला आहे, आणि संबंधित कायदेशीर किंवा संचालनात्मक जतन आवश्यकता अशा प्रत्येक प्रकरणानुसार हे निश्चित केले जाते. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही Facebook वर कशाचा तरी शोध घेता, तेव्हा तुम्ही कोणत्याही वेळेला तो शोध तुमच्या शोध इतिहासातून प्रवेश करून हटवू शकता, परंतु त्या शोधाचा लॉग 6 महिन्यानंतर हटवला जातो. शासनाद्वारे जारी केलेल्या तुमच्या ID ची प्रत खाते सत्यापनाच्या उद्देशासाठी जर तुम्ही सबमिट केली तर आम्ही ती प्रत दाखल केल्यापासून 30 दिवसानंतर हटवतो. तुम्ही सामायिक केलेली सामग्री आणि सोशल प्लगइनद्वारे प्राप्त केलेला कुकी डेटा हटविण्याविषयी अधिक जाणून घ्या.

तुम्ही तुमचे खाते हटवता तेव्हा, तुम्ही पोस्ट केलेल्या गोष्टी आम्ही हटवतो जसे की तुमची छायाचित्रे किंवा स्थिती अद्यतने आणि तुम्ही ती माहिती नंतर पुनर्प्राप्त करू शकणार नाही. अशी माहिती जी इतरांनी तुमच्याविषयी सामायिक केली आहे ती तुमच्या खात्याचा भाग नाही आणि ती हटवली जाणार नाही. तुम्हाला तुमचे खाते हटवायचे नसेल, परंतु उत्पादने वापरणे तात्पुरते थांबवायचे असेल तर, तुम्ही त्याऐवजी तुमचे खाते निष्क्रिय करू शकता. कधीही तुमचे खाते हटवण्याकरता, कृपया Facebook सेटिंग्ज आणि Instagram सेटिंग्जलाभेट द्या.

कायदेशीर विनंत्यांना आम्ही कसा प्रतिसाद देतो किंवा धोका कसा टाळतो?

आम्ही तुमच्‍या माहितीत प्रवेश करतो, ती संरक्षित करतो आणि ती नियामकांसह, कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या किंवा अन्य लोकांसह सामायिक करतो:
 • कायद्यानुसार जर आम्ही असे करणे आवश्यक आहे याचा आम्हाला विश्वास वाटत असल्यास कायदेशीर विनंतीस (जसे की शोध वॉरंट, न्यायालयीन आदेश किंवा साक्षीसमन्स) प्रतिसाद म्हणून. यामध्ये युनायटेड स्टेट्सच्या बाहेरील न्यायाधिकार क्षेत्रांच्या कायदेशीर विनंत्यांना प्रतिसाद देण्याचा समावेश असू शकतो, जेव्हा आम्हाला सद्भावनेपोटी विश्वास वाटत असेल की त्या न्यायाधिकार क्षेत्रामध्ये तो प्रतिसाद कायद्याने आवश्यक आहे, त्या न्यायाधिकार क्षेत्रामधील वापरकर्त्यांना प्रभावित करतो आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त मानकांशी अनुरूप आहे.
 • आम्हाला सद्भावनेपोटी ज्यावेळी विश्वास वाटत असेल की हे करणे आवश्‍यक आहे: घोटाळा, उत्पादनांचा अनधिकृत वापर, आमच्या अटी किंवा धोरणांची उल्लंघने किंवा अन्य धोकादायक किंवा बेकायदेशीर क्रियाकलाप; शोधणे, त्यास प्रतिबंधित करणे आणि त्याचे निराकरण करणे, आमचे (आमचे अधिकार, मालमत्ता किंवा उत्पादनांसह), तुमचे किंवा इतरांचे, संरक्षण करण्‍यासाठी, याच्या समावेशासह तपासण्यांचा किंवा नियमन चौकश्यांचा भाग म्हणून; किंवा मृत्यू किंवा तात्काळ होणारी, शारीरिक ईजा टाळणे. उदाहरणार्थ, संबंधित असल्यास, आमच्या उत्पादनांमधील किंवा बाहेरील घोटाळा, गैरवर्तन आणि अन्य धोकादायक क्रियाकलाप प्रतिबंधित करण्‍यासाठी आम्ही तृतीय-पक्षाच्या भागीदारांसह तुमच्या खात्याच्या विश्वसनीयतेबद्दलच्या माहितीची देवाण घेवाण करतो.
जेव्हा कायदेशीर विनंतीचा किंवा दायित्वाचा, प्रशासकीय तपासणी किंवा आमच्या अटी किंवा धोरणांच्या संभाव्य उल्लंघनांशी संबंधित किंवा नुकसानास प्रतिबंध करण्याचा विषय असेल तेव्हा आम्ही तुमच्याबद्दल (Facebook सह केलेल्या खरेदींसंबधित वित्तीय व्यवहार डेटासह) प्राप्त करतो त्या माहितीत प्रवेश केला जाऊ शकतो आणि वाढविलेल्या कालावधीसाठी ती संरक्षित केली जाऊ शकते. वारंवार होणाऱ्या गैरवर्तनास किंवा अन्य अटींच्या उल्लंघनांना प्रतिबंधित करण्यासाठी आम्ही आमच्या अटींची उल्लंघने केल्यामुळे अक्षम केलेल्या खात्यांमधील माहिती देखील किमान एका वर्षासाठी राखून ठेवतो.

आम्ही आमच्या जागतिक सेवेचा भाग म्हणून डेटा संचालन आणि हस्तांतरण कसे करतो?

या धोरणानुसार आम्ही अंतर्गतपणे Facebook कंपन्यांसह आणि बाह्यरित्या आमच्या भागीदारांसह आणि जगभरात तुम्ही ज्यांच्यासह कनेक्ट होता आणि सामायिक करता त्यांच्यासह जागतिक पातळीवर माहिती सामायिक करतो. तुमची माहिती, उदाहरणार्थ, या धोरणात वर्णन केलेल्या हेतूंसाठी युनायटेड स्टेट्स किंवा तुम्ही राहता त्या देशाबाहेर स्थानांतरित, किंवा प्रसारित किंवा संग्रहित केली जाऊ शकते आणि तिच्यावर प्रक्रिया केली जाऊ शकते. ही डेटा स्थानांतरणे Facebook अटी आणि Instagram अटी यामध्‍ये नमूद केलेल्या सेवा प्रदान करण्‍यासाठी आणि जागतिक पातळीवर संचालन करण्‍यासाठी आणि आमची उत्पादने तुम्हाला प्रदान करण्‍याकरिता आवश्यक आहेत. आम्ही मानक करारनाम्याची कलमे वापरतो, लागू असल्यानुसार काही देशांबद्दल युरोपियन कमीशनच्या पुरेसे निर्णय यावर अवलंबून असतो, आणि युनायटेड स्टेट्स आणि अन्य देशांमध्‍ये या डेटा स्थानांतरणांसाठी तुमची संमती मिळवितो.

या धोरणातील बदलांबाबत आम्ही तुम्हाला कसे सूचित करू?

या धोरणामध्ये आम्ही बदल करण्यापूर्वी आम्ही तुम्हाला सूचित करू आणि तुम्ही आमच्या उत्पादनांचा वापर पुढे चालू ठेवणे निवडण्‍यापूर्वी सुधारित धोरणाचे पुनरावलोकन करण्याची संधी आम्ही तुम्हाला देऊ.

प्रश्नांसाठी Facebook शी कसा संपर्क साधावा

गोपनीयता कशा प्रकारे काम करते त्याविषयी तुम्ही Facebook वर आणि Instagram वर अधिक जाणून घेऊ शकता. तुम्हाला या धोरणाबद्दल प्रश्न असल्यास, तुम्ही आमच्याशी खाली वर्णन केल्याप्रमाणे संपर्क करू शकता. आमची गोपनीयता धोरणे आणि व्यवहार या संबंधात तुमच्या आमच्यासोबत असलेल्या वादांचे आम्ही TrustArc मार्फत निराकरण करू शकतो. तुम्ही TrustArc शी त्यांच्या वेबसाइटमार्फत संपर्क करू शकता.
आमच्याशी संपर्क करा
तुम्ही आमच्याशी ऑनलाइन किंवा इथे मेल पाठवून संपर्क साधू शकता:
Facebook, Inc.
ATTN: Privacy Operations
1601 Willow Road
Menlo Park, CA 94025


अंतिम उजळणीची तारीख: 19 एप्रिल, 2018